प्रातिनिधिक छायाचित्र - (Freepik)
महाराष्ट्र

शेतीसाठी 'एआय'! 'पिक, पशु संवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप'; शेतकऱ्यांना मिळणार कृषी विषयक ज्ञान

मुंबई : शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने शेती क्षेत्रात एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वसमावेशक शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास सरकारने मान्यता दिली. उसासह अन्य पिके आणि पशुसंवर्धनासाठी याचा वापर केला जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने शेती क्षेत्रात एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वसमावेशक शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास सरकारने मान्यता दिली. उसासह अन्य पिके आणि पशुसंवर्धनासाठी याचा वापर केला जाणार आहे.

शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत, यंत्र अवजारांबाबत, शेतक-यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासांठी एकात्मिक अभियान प्रणाली आणि प्रत्येक पिकासाठी तयार केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यास हे अँप मदत करणार आहे. तसेच डिजिटल शेतीशाळा, पाणी शाळा, पशुशाला यांच्या माध्यमातून मृदा आरोग्य, जलव्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यांच्याशी निगडीत शैक्षणिक संसाधनांचीही माहिती देईल. या ॲपची विस्तार या केंद्र सरकारच्या अद्ययावत आणि विद्यमान संरचनांशी सांगड घातली जाणार आहे.

व्यक्तिगत पातळीवर अधिक ज्ञान मिळविण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. या ॲपद्वारे केवळ पीक उत्पादनच नव्हे तर काढणी पश्चात प्रक्रियेसंदर्भातही माहिती दिली जाणार असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. या ॲपचा पहिला टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तर शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा टप्पा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

असा वापर होणार अँपचा

शेतक-यांसाठी अभिप्राय प्रणाली, यामध्ये शिक्षण मापन प्रणाली आणि सामूदायिक विषय निर्मिती यांचा समावेश असेल. जेणेकरून प्रत्येक शेती शाळेद्वारे दिलेले शिक्षण आणि त्याची उपयुक्तता नोंदवता येईल.

पीक हंगामात प्रत्येक पिकासाठी निश्चित केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीनुसार सूचनांद्वारे शेतक-यांना मदत करणे.

शेतीशाळा, पाणीशाळा आणि पशुशाळा प्रसारित करण्याचे माध्यम विस्तार नेटवर्क मधील ज्ञानाचा फायदा कृषी प्रकीया आणि विपणनासह काढणीपश्चात मूल्य साखळी संदर्भात शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय