प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

डहाणूत बुलेट ट्रेनचा गर्डर बसविण्यात यश; महाराष्ट्रात पहिलाच ४० मीटर लांबीचा बॉक्स गर्डर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांमध्ये मोठी प्रगती झाली असून, राज्यात पहिल्यांदाच ४० मीटर लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे.

Swapnil S

वाडा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील कामांमध्ये मोठी प्रगती झाली असून, राज्यात पहिल्यांदाच ४० मीटर लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील साखरे गावात हे ऐतिहासिक काम नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्र विभाग १५६ किलोमीटर लांब असून, या मार्गासाठी अशा प्रकारच्या गर्डर्सची आवश्यकता आहे.

प्रत्येक गर्डर ४० मीटर लांबीचा आणि ९७० मेट्रिक टन वजनाचा असून, यामुळे ते भारतात बांधल्या जाणाऱ्या सर्वात जड गर्डर्सपैकी एक ठरतात. या गर्डर्समध्ये ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरण्यात येते. या प्रकल्पात फुल-स्पॅन बॉक्स गर्डर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे, कारण हे पारंपरिक सेग्मेंटल गर्डर्सच्या तुलनेत १० पट जलद वेगाने उभारता येतात.

या गर्डर्सच्या बसवणीसाठी विशेष स्वदेशी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जातो, ज्यात स्ट्रॅडल कॅरिअर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गर्डर ट्रान्सपोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विभागात १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित

या गर्डर्ससाठी विशेष कास्टिंग यार्ड्स उभारण्यात आले असून, महाराष्ट्र विभागात १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित आहेत. त्यापैकी ५ यार्ड्स सध्या कार्यान्वित आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुजरातमध्ये ३०७ किलोमीटर लांबीचा व्हायाडक्ट आधीच पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या कामांना एप्रिल २०२१ पासून गती मिळाली असून, त्यात बुलेट ट्रेन मार्गिकेवरील विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचे कामही यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video