प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

एलएलबी, बीएड, बीपीएडसाठी ९० हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार; अर्जातील दुरुस्तीसाठी उद्यापर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एलएलबी, बीएड-एमएड आणि बीपीएड अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया संपली असून या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी ९० हजार १२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अर्जातील दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एलएलबी (३ वर्षीय), बीएड - एमएड (३वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) व बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड ) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ३ मार्च रोजी संपली. या तिन्ही अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा ९० हजार १२६ विद्यार्थी देणार आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ९ ते ११ मार्च दरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एलएलबी (३ वर्षीय) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ८ ते २३ जानेवारी पर्यंत होती. यानंतर १३ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. तर बीएड + एमएड या अभ्यासक्रमाच्या सीईटी अर्ज भरण्यास ९ ते २४ जानेवारी २०२६ पर्यंत होती. यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. बीपीएडच्या या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा अर्ज भरण्यास १६ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत होती. यानंतर १७ फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. यानंतर या तिन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत दुसरी मुदतवाढ आणि तिसरी व अंतिम मुदतवाढ ३ मार्चपर्यंत देण्यात आली होती.

यावर्षी एलएलबी (३ वर्षीय) या अभ्यासक्रमास ८२ हजार ८८३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. बीएड + एमएड (३ वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमास १२२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. बीपीएड अभ्यासक्रमास ६०१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

एलएलबी (३ वर्षीय) या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १ ते २ एप्रिल दरम्यान होणार आहे. बीएड + एमएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ९ एप्रिल रोजी होणार आहे. तर बीपीएड या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल रोजी होणार आहे. तर याची फिल्ड परीक्षा (ऑफलाइन) ५ ते ७ एप्रिल रोजी होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगइनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे.

बी. डिझाईन सीईटी १ हजार ७१८ विद्यार्थी देणार परीक्षा

अर्जातील दुरुस्तीसाठी ११ मार्चपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. बी. डिझाईन या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपली. या अभ्यासक्रमासाठी १ हजार ७१८विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील, तर त्या ११ मार्च दरम्यान ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्जात विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही व लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ५ एप्रिल रोजी होणार आहे.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू