FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्याने शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्याने शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आजपर्यंत प्रवेशासाठी ११ लाख ३६ हजार ६५० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अकरावी प्रवेशाची नियमित फेरी १ ची प्रक्रिया २१ मे पासून सुरू करण्यात आली आहे. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता २१ ते २३ मे पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. तसेच या फेरीचे सुधारीत वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

आजचे राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुलांना आवडेल असा हटके स्नॅक; १५ मिनिटांत बनवा चॉकलेट पॉपकॉर्न

अंडी खाण्याआधी सावधान! 'या' संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा अंदाज; कर्णफुलं अन् सोनेरी टिशू पैठणीची सोशल मीडियावर चर्चा

नेहमीची इडली विसरा! एकदा ट्राय करा चटपटीत बटाटा-रवा इडली