अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला

महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रक्रियेत दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणानंतर अंतिम यादी प्रसिध्द करण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या प्रक्रियेत दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. मात्र, सुधारित वेळापत्रकामुळे अंतिम यादी प्रसिद्ध होण्यास जवळपास महिनाभराचा विलंब झाला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्वी २९ जुलैपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. आता ती २४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (BLO) करण्यात आलेली घराघरातील मतदार पडताळणीची प्रक्रिया १७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. या मोहिमेदरम्यान राज्यातील विविध भागांतील मतदारांच्या घरी भेट देऊन बीएलओनी मतदारांकडून एन्युमरेशन फॉर्म जमा केले. या प्रक्रियेची मुदत निवडणूक आयोगाने यापूर्वी वाढवली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Shiv Sena Symbol Dispute: ...तर पक्षचिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

FDA ची नजर आता शाळा-कॉलेजच्या कॅंटिनकडे; लवकरच दिसतील परिणाम, तुकाराम मुंढेंचे संकेत

अभियंत्यांच्या बदल्यांसाठी 'फिल्डिंग'! मुंबई पालिकेत वाढला राजकीय हस्तक्षेप; मंत्री, आमदारांसह विरोधी पक्षही अग्रसेर

Mumbai : आणखी १५० दुमजली ईव्ही बसेस; १० ओपन डबल डेकर बसची सफर, BEST समितीची मंजुरी 

Mumbai : २२ बेस्ट डेपोंच्या विकासाला मंजुरी; पालिकेत खडाजंगी; आधीच्या डेपो-विक्रीबाबत श्वेतपत्रिका काढा- विरोधकांची मागणी