Pune : सुधारित ‘उडान’ योजनेत महाराष्ट्राला संधी; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड (Photo-X)
महाराष्ट्र

Pune : सुधारित ‘उडान’ योजनेत महाराष्ट्राला संधी; सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड

महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ (Modified UDAN) योजनेअंतर्गत सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ (Modified UDAN) योजनेअंतर्गत सोलापूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे.

या मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सोलापूर आणि अमरावती या शहरांचा प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि लहान-मध्यम शहरांमध्ये हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारण्याच्या उद्देशाने ‘उडान’ योजना राबविण्यात येत आहे.

सुधारित योजनेत राज्यांना प्रादेशिक हवाई मार्ग निश्चित करण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रासाठी सोलापूर-मुंबई-सोलापूर आणि अमरावती-पुणे-अमरावती या मार्गांची निवड करण्यात आली आहे. अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक, व्यापारी आणि कृषी केंद्र आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात; लागवडीचे क्षेत्र घटले, दरवाढीची चिन्हे

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

ही तर ‘सेटिंग’च - अभिजीत दिपके