प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल जाहीर; २ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९७.४० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९५.९० टक्के लागला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९७.४० टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९५.९० टक्के लागला आहे.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल https://msbae.ac.in या संकेतस्थळावरील GRADE EXAM या टॅबमध्ये व https://dge.msbae.in/https://dge.msbse.in/Result/Search/Form या लिंकवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा शालेय स्तरावर सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आली होती. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांमध्ये २०२५ या वर्षी एकूण ७.१९,४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एलिमेंटरी परीक्षेसाठी ४ लाख ४ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी खेळू होती. यापैकी ३ लाख ९० हजार १०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर १४ हजार ६७४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या परीक्षेत ३ लाख ७९ हजार ९५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

२ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३ लाख १४ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३ लाख ७ हजार ८२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर ६ हजार ८४२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९५ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा