महाराष्ट्र

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील समजले जाणारे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची मंगळवारी बदली करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील समजले जाणारे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची मंगळवारी बदली करण्यात आली. सिंघल यांच्या जागी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त या नवनिर्मित पदावर झाली आहे. तर डॉ. जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची वर्णी लागली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उद्योग विकास आयुक्त म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची बदली आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर करण्यात आली आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड