विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक उद्या रंगणार; नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे यांच्यात चुरस 
महाराष्ट्र

विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक उद्या रंगणार; नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे यांच्यात चुरस

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी विधान परिषदेत जाहीर केला. त्यानुसार १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता या पदासाठी मतदान होणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी विधान परिषदेत जाहीर केला. त्यानुसार १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता या पदासाठी मतदान होणार आहे.

या जागेसाठी शिवसेना शिंदे गटात चुरस निर्माण झाली असून माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार मनीषा कायंदे यांच्यात जोरदार स्पर्धा लागली आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. विधान परिषदेत सध्या भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, महायुतीमधील सत्तावाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसार उपसभापतीपद पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटातच या पदासाठी मोठी चुरस लागली आहे. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्या या शर्यतीत सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तसेच पक्षांतर्गत वर्तुळात कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

पक्षीय बलाबल

पक्ष - संख्या

भाजपा - ३५

शिवसेना (शिंदे) - ११

राकाँपा (अजित) - १०

काँग्रेस - ५

शिवसेना (उद्धव) - ६

राकांपा (शरद) - २

अपक्ष - ४

रिक्त - ५

एकूण - ७८

निवडणूक बिनविरोध?

महाविकास आघाडीकडे (मविआ) विधान परिषदेत आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधक या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवून ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, अशी रणनीती आखत आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली, तर १ जुलै रोजीच नवीन उपसभापतींच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित