राज्याला धोका कुष्ठरोगाचा प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

राज्याला धोका कुष्ठरोगाचा; २ वर्षांत १८०० हून अधिक रुग्णांची नोंद; ४१,२६९ संशयित रुग्ण; 'कुसूम सर्वेक्षणा'तून धक्कादायक माहिती उघड

महाराष्ट्र राज्य २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त’ करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुष्ठरुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये ‘कुसूम सर्वेक्षण मोहीम’ राबविण्यात आली होती. या मोहिमेत ३३ लाख ७४ हजार ९८२ लोकांची तपासणी केली असता ४१ हजार २६९ संशयित रुग्ण आढळले...

गिरीश चित्रे

मुंबई : महाराष्ट्र राज्य २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोगमुक्त’ करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुष्ठरुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये ‘कुसूम सर्वेक्षण मोहीम’ राबविण्यात आली होती. या मोहिमेत ३३ लाख ७४ हजार ९८२ लोकांची तपासणी केली असता ४१ हजार २६९ संशयित रुग्ण आढळले, तर तब्बल १,८७१ रुग्ण हे कुष्ठरोगी असल्याची धक्कादायक माहिती ‘कुसूम सर्वेक्षणा’तून पुढे आली आहे.

महाराष्ट्र कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत कुसूम सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. कुष्ठरोगाचे ‘वेळीच निदान व वेळीच उपचार’ ही संशयित रुग्णांची शोधमोहीम राबविण्यात आली. या शोधमोहिमेत ८१ नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्य सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

मुंबई ‘कुष्ठरोगमुक्त’ करण्याचे उद्दिष्ट ठेवत राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कुष्ठरुग्णांची शोध मोहीम हाती घेतली होती. या शोधमोहिमेत ३२ लाख ७४ हजार ९८२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४१ हजार २६९ संशयित आढळले.

एकूण आकडेवारी

  • तपासणी - ३३ लाख ७४ हजार ९८२

  • संशयित रुग्ण - ४० हजार ७०५

  • निदान - १,८७१ रुग्ण आढळले

कुष्ठरोगाची लक्षणे :

कुष्ठरोगबाधित रुग्णांच्या त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा अथवा चट्टे येणे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे; तसेच तळहातावर वा तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे यांसारखी लक्षणे आढळून येतात.

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

कर्जतमध्ये मिरचीचे दर दुप्पट; गृहिणींना महागाईचा ठसका; परदेशात मसाल्यांची निर्यात

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण