सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बदल्या समुपदेशनाद्वारे; आरोग्य विभागाचे वेळापत्रक जाहीर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बदल्या समुपदेशनाद्वारे; आरोग्य विभागाचे वेळापत्रक जाहीर

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पारदर्शक व त्यात सुसूत्रता आणण्यात भर देण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पारदर्शक व त्यात सुसूत्रता आणण्यात भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय १५ एप्रिलनुसार समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्या करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्या अनुषंगाने संचालक, आरोग्य सेवा यांनी ८ परिमंडळातील सर्व कार्यक्रम प्रमुख यांच्या बदल्यांचे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर केले आहे. रिक्त पदांची यादी ६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी ८ मे रोजी प्रसिद्ध केली तसेच प्रपत्र १ ते ५ तयार करून नागरी सेवा मंडळासमोर १० मे रोजी सादर केली. मंडळाकडून समुपदेशनाने बदलीचे अंतिम प्रस्ताव १५ मे पर्यंत पाठवण्यात येणार आहेत.

दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व

या नव्या धोरणानुसार बदल्या करताना सेवा कालावधी, प्राधान्यक्रम, पसंतीक्रम, प्रशासकीय गरज तसेच दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अपंग कर्मचारी, गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी, विधवा महिला, पती-पत्नी एकत्रीकरण आणि शैक्षणिक कारणे यांसारख्या मानवी बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

बदली प्रक्रिया पारदर्शक

बदली प्रक्रिया पूर्णपणे प्रशासकीय आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव अथवा हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होऊन राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेचा दिलासा

Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं

बँक खाती वापरण्यास ममता बॅनर्जींना परवानगी नाही

डीलिमिटेशनबाबत सर्वपक्षीय बैठक घ्या; खर्गेंचे मोदींना पत्र

बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप