संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

१० वी-१२ वीच्या पूरक परीक्षा २४ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

वेळापत्रकाची प्रत संबंधित विभागीय मंडळे, तसेच शिक्षण विभागाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवरील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पूरक परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर दि. २२ मेपासून हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २४ जून ते ११ जुलै दरम्यान घेण्यात येतील. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) ची लेखी परीक्षा २४ जूनपासून सुरू होऊन ८ जुलैपर्यंत चालणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या काळात होतील.

इयत्ता १० वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक २४ जून ते ४ जुलै या दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १२ वी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने दिनांक १५ व १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर दिनांक २२ मेपासून हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की, वेबसाइटवर प्रसिद्ध झालेले वेळापत्रक हे अंतिम असेल आणि शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी सदर वेळापत्रक डाउनलोड करून परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले किंवा प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

या वेळापत्रकाची प्रत संबंधित विभागीय मंडळे, तसेच शिक्षण विभागाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवरील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात; प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवण्याची महसूल विभागाची तयारी

Mumbai : म्हाडाकडे घरबसल्या करता येणार तक्रार; सीएफसी@होम, व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे अनावरण

Mumbai : शस्त्रक्रियांचा दर्जा, अचूकता, सुरक्षितता वाढणार; KEM रुग्णालयात प्रगत ‘व्हेसल सीलर’ तंत्रज्ञान

Mumbai : नालेसफाईच्या कामात तीन तेरा; मिठी नदीतील गाळ उपसा करण्यात अपुरी यंत्रणा, सत्ताधारी पक्षाच्या पाहणी दौऱ्यात पोलखोल