प्रातिनिधिक छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

राज्यात हवामान बदलणार; दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा कडाका; IMD चा मोठा अंदाज

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने दक्षिण भारतातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

Swapnil S

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने दक्षिण भारतातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या शुक्रवारी १३ नोव्हेंबरच्या आसपास ही हवामान प्रणाली विकसित होण्याचा अंदाज आहे. राज्यात दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री-पहाटे वाढणारा गारवा असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची चाहूल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सध्या पावसाची शक्यता नसून राज्यातील पाचही विभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानातील बदल पाहायला मिळत आहेत. यापूर्वी अर्णब आणि मुरासू या दोन चक्रीवादळांमुळे हा परिसर चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा याच भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ नोव्हेंबरच्या आसपास आग्नेय बंगालच्या उपसागरात ही प्रणाली विकसित होऊ शकते.

नव्या प्रणालीच्या मार्गाबाबत वेगवेगळे अंदाज

सुरुवातीला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढून सुस्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रणालीमुळे लगेच चक्रीवादळ निर्माण होईल, असे निश्चितपणे सांगता येत नाही. सध्या विविध हवामान मॉडेल्सकडून या प्रणालीच्या संभाव्य मार्गाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.काही मॉडेल्सनुसार ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकू शकते, तर काही अंदाजांमध्ये तिचा प्रवास म्यानमारच्या दिशेने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रणालीची दिशा आणि तीव्रता यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

दक्षिण भारतात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये जाणवू शकतो. विशेषतः तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवगंगा, रामनाथपुरम, तुतीकोरीन आणि तिरुनेलवेली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय कावेरी डेल्टा परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मुंबईसह कोकणात उष्ण, दमट वातावरण

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात दिवसा उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकते. विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात दिवसा उन्हाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, संध्याकाळनंतर आणि पहाटेच्या वेळी हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवू शकतो.कोकण किनारपट्टीवर सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने नागरिकांना तूर्तास पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दमट हवामानामुळे दिवसा उकाडा जाणवू शकतो.

पुणे, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा उन्हाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून रात्रीच्या तापमानात घट होऊ शकते. विशेषतः ग्रामीण आणि मोकळ्या भागांमध्ये पहाटेच्या वेळी गारवा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.पुणे परिसरात दिवसा उष्णता आणि रात्री थंडावा असे वातावरण अनुभवायला मिळू शकते. तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता नसून कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात दिवसा उन्हाचा प्रभाव जाणवू शकतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'पॅन' अन् 'मतदार कार्ड' नागरिकत्वाचा पुरावा नाही; गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळला दावा

देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात

मुंबईतील ४३ बेकऱ्यांना BMC ने टाळे ठोकले; स्वच्छ इंधनाचा वापर न केल्याने परवाने रद्द

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF चे तीन जवान जखमी