जिप, पंचायत समिती निवडणूक : ५५ टक्के मतदान; मतमोजणी सोमवारी 
महाराष्ट्र

जिप, पंचायत समिती निवडणूक : ५५ टक्के मतदान; मतमोजणी सोमवारी

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारीला सकाळी हाती घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Swapnil S

मुंबमुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारीला सकाळी हाती घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान मतदान झाले. अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.

रायगडमध्ये ५७.७७ टक्के मतदान

दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रायगडमध्ये ५७.७७ टक्के, रत्नागिरीत ४७.३८, सिंधुदुर्ग ५०.१०, पुणे ५१, सातारा ५२.०२, सांगली ५१.४७, सोलापूर ४७.६६, कोल्हापूर ५८.८१, छत्रपती संभाजीनगर ५१.५२, परभणी ५५.७१, धाराशिव ५०.०७ आणि लातूरमध्ये ५०.०५ टक्के मतदान नोंदवले गेले.

मतदानाची अंतिम टक्केवारी वाढणार

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीसाठी ५२.०२ टक्के इतके मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढणार आहे.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा