Nanded : माहूरगडावरील नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - जिल्हाधिकारी  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Nanded : माहूरगडावरील नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - जिल्हाधिकारी

माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिले.

Swapnil S

नांदेड : माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिले.

माहूर येथे ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष किरणकुमार भोंडवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप, विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

माहूरगडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली. भाविकांच्या सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

नगरपंचायतीतर्फे दत्त चौक येथील नियंत्रण कक्ष, पाणी, पथदिवे आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दत्तशिखर संस्थानतर्फे पाणी, स्वच्छता, वीज, महाप्रसाद तसेच संस्थानच्या जागेत मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली.

भाविकांसाठी महाप्रसाद

पंचायत समितीच्या माध्यमातून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, सुलभ दर्शन रांगा तसेच परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाणा खिचडी व फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे, असे प्रशासनाने कळवले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळ पाहणीसाठी येणार केंद्राचे पथक; पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य - फडणवीस

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

APMC मध्ये कोथिंबीर तेजीत; स्वयंपाकघराची चवच बिघडली, जुडीचा भाव थेट ४५ रुपयांवर, आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री