खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल 
महाराष्ट्र

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (दि.२६) हत्या करण्यात आली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार, मुलांना शाळेत सोडून परत येत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात त्यांना अडवून खाली पाडले. खाली पडल्यानंतर दोन-तीन जणांनी त्यांना घेरले आणि त्यानंतर पाच ते सहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात हल्लेखोरांनी दगड, तलवारी आणि कोयत्यांचा वापर करत मंगेश काळोखे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर २४ ते २५ वार केले. हा हल्ला इतका क्रूर होता की मंगेश काळोखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

Mumbai : १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; उच्च न्यायालयाने गुन्हा केला रद्द

Mumbai : गर्दीवर तोडगा काढा, एसीचे भाडे कमी करा; जनसंवादात प्रवाशांचा रेल्वेकडे तक्रारींचा मारा

Mumbai : जीएमएलआरसाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, वॉचडॉग फाऊंडेशनची मागणी

Mumbai : अवैध मानवी स्त्रीबीज काढण्याच्या रॅकेटप्रकरणी ED ची कारवाई; २९ लाखांची रोकड जप्त

सामायिक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; जमीन विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी नियमसक्ती