'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

गेल्या अनेक वर्षांच्या संथ कारभारानंतर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने (एमएमसी) तक्रार निवारण प्रक्रियेचा वेग वाढवला आहे.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

गेल्या अनेक वर्षांच्या संथ कारभारानंतर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने (एमएमसी) तक्रार निवारण प्रक्रियेचा वेग वाढवला आहे. काऊन्सिलने जुलै २०२६ च्या पहिल्याच आठवड्यात ४३ तक्रारी निकाली काढल्या असून ही अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठी वार्षिक निपटारा संख्या ठरली आहे. मात्र, गती वाढूनही काऊन्सिलकडे तब्बल ८४९ प्रलंबित तक्रारींचे डोंगर साचले असून वैद्यकीय दुर्लक्ष आणि व्यावसायिक गैरवर्तनाचा आरोप असलेल्या डॉक्टरांवर जलद कारवाईची गरज अधोरेखित होत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०२२ ते जुलै २०२६ दरम्यान एमएमसीकडे ३०१ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू होणे, जास्त शुल्क आकारणे, अनैतिक वर्तन आणि अपूर्ण उपचारांशी संबंधित गंभीर आरोपांचा समावेश आहे. काऊन्सिलने २०२२ मध्ये अवघ्या दोन तक्रारी निकाली काढल्या होत्या, तर २०२३ आणि २०२४ मध्ये एकही प्रकरण मार्गी लागले नव्हते. २०२५ मध्ये २५ प्रकरणे निकाली काढून परिस्थितीत सुधारणा झाली, तर या वर्षी जुलैपर्यंत ४३ तक्रारींचा निपटारा बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देणे, करून या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे.

वर्षानुवर्षे सुनावणीच नाही

पश्चिम उपनगरातील एका रिक औषधे लिहून देत नाहीत आणि विशिष्ट रक्तपेढीतूनच रक्त चढवण्यास भाग पाडतात, अशी २०१७ मध्ये दाखल झालेली तक्रार नऊ वर्षांनंतरही प्रलंबित आहे. तक्रारदार स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असून संबंधित डॉक्टरला नोटीस बजावूनही ९ वर्षांनंतरही एकही सुनावणी झालेली नाही. पदवी नसलेल्या पॅथॉलॉजिस्टविरोधात तक्रार केली होती. ती आजही प्रलंबित असल्याचे आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात