'मृगा'च्या आधीच मान्सून कोकणात; वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

'मृगा'च्या आधीच मान्सून कोकणात; वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात

मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदवार्ता आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदवार्ता आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून केरळमध्ये ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनची गती वाढली आहे. शुक्रवारी मान्सून तामिळनाडूमध्ये कर्नाटक, पोहोचला होता. त्यानंतर शनिवारी मान्सून कोकण आणि गोव्यात दाखल झाला आहे. आता मान्सून वेगाने प्रगती करत आहे, त्यामुळे तो लवकरच उत्तरेकडे सरकून मुंबईसह राज्याच्या विविध भागात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविधभागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आता मान्सून उत्तरेकडे सरकून लवकरच संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाऊस पडल्यानंतर पेरण्यांच्या कामांनाही वेग येणार आहे.

अनेक भागांत पावसाची शक्यता

दरम्यान, राज्यासह दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जून रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत २५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश