महाराष्ट्र

MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर; नीलेश महाजन राज्यात प्रथम

सहाय्यक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीत नीलेश मनोहरराव महाजन पहिला आला आहे.

Swapnil S

नागपूर : सहाय्यक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीत नीलेश मनोहरराव महाजन पहिला आला आहे. विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे दाखल (मूळ अर्ज ४२/२०२६) प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र/कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो किंवा उमेदवार अपात्र देखील ठरू शकतो याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

आदिवासी समाजाला एकही पद नाही

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे. परभणीत २२ पदे असून, त्यात दोन पदे आदिवासींसाठी आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील विविध विभागातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- ब या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी तशी जाहिरात देण्यात आली होती. सहायक प्राध्यापक पदांच्या ५८० जागा असून, नव्याने स्थापन झालेल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील १८५ पदे अशा एकूण ७६५ जागांचा समावेश आहे. याची परीक्षा झाली असून तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुलाखतीनंतर तात्पुरती यादी

सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट – ब या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. मुलाखतीनंतर आता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन