'एआय'ने बनविलेली प्रतिमा
महाराष्ट्र

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री भोवली; परिवहन विभागाने दिला दणका

नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Krantee V. Kale

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही विक्रेत्यांकडून एनसीएमसी कार्डची जादा दराने विक्री होत असल्याने परिवहन विभागाने काही परवाने रद्द केले आहेत.

नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश

रेल्वेचे तिकीट तपासनीस होणार हायटेक; टीसी आणि प्रवाशांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद करणार

शाळांमधील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग सुकर; शासनाकडून पदभरतीस मान्यता