ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्टकार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्टकार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत.

एनसीएमसी स्मार्टकार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्टकार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्टकार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना एनसीएमसी स्मार्टकार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार आहे.

१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचे वाटप

येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्टकार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल; सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी साखळी, कार्यशाळेचे आयोजन

Mumbai : १११ क्र.बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त

Solapur : पुढचे आंदोलन थेट ‘वर्षा’वर; मनोज जरांगेंचा इशारा

Mumbai : मृतांचा आकडा आठवर! घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली; मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा

Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्या