महाराष्ट्र

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

या घटनेचा साधारण ४० सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन मुलगी मागील सीटवर बसली असून रिक्षाचालक...

Swapnil S

नागपूरमध्ये रिक्षाचालकाने एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून नियमितपणे ज्या रिक्षातून ती घरी जायची, त्याच रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केला. २५ वर्षीय रिक्षाचालक मुलीला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला होता. नागपुरातील ओंकार नगर परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेचा साधारण ४० सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन मुलगी मागील सीटवर बसली असून रिक्षाचालक तिला अयोग्यपणे नको तिथे स्पर्श करताना व्हिडिओत दिसत आहे. तर, रिक्षाचालकाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेली मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी शक्य तितक्या मागे जाण्याचा आणि हातवारे करुन त्याला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रिक्षाचालक सुमारे दोन वर्षांपासून नियमितपणे मुलीला शाळेतून घरी सोडतो. पण बुधवारी त्याने रिक्षा दुसऱ्या मार्गावर नेली होती. त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका जोडप्याने ही घटना पाहिली आणि दृष्य कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात संतापाची लाट उसळली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे काही तासांतच ऑटोचालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. परंतु घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलीच्या पालकांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. पीडितेच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर Pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'

तमिळ अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३३ जणांचा मृत्यू; ५० जखमी

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत