नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसाअभावी शेतकरी हवालदिल, खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसाअभावी शेतकरी हवालदिल, खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य

जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Swapnil S

नांदेड : जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया जाण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत असून, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात लोहा तालुक्यातील धनज (बु.) येथील एका शेतकऱ्याने शेतातील पीक वाया गेल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तसेच, २८ सप्टेंबर रोजी लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील ७० वर्षीय शेतकरी घनश्याम चंदर कदम यांनी दुष्काळी परिस्थितीला कंटाळून कीटकनाशक प्राशन केल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

सततचा पावसाचा अभाव, बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, उत्पादन खर्च, बँकांचे कर्ज आणि सावकारी कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी हतबल होत असल्याचे चित्र आहे.

प्रमुख कारणे

  • पावसाचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा कमी राहणे.

  • खरीप पिकांचे नुकसान आणि पेरणीचा खर्च वाया जाणे.

  • बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमतीत वाढ.

  • कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचणे.

  • शेतमालाला अपेक्षित हमीभाव न मिळणे.

मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ६१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या तीन महिन्यांत आणखी ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये जूनमध्ये १४, जुलैमध्ये १३ आणि ऑगस्टमध्ये ८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात नांदेड जिल्ह्यात १७० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. मराठवाड्यात जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत एकूण ४६५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून, त्यापैकी ६१ प्रकरणे नांदेड जिल्ह्यातील आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगाम धोक्यात आला असताना शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीक नुकसान, कर्जाचा बोजा आणि शासकीय मदतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पॅकिंग खर्च वाढल्याने मसाल्यांचे दर वाढणार; अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाचे पडसाद

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी

जयशंकर, रुबिओ यांच्यात २० ऑक्टोबरला चर्चा होणार; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे जम्मू-काश्मीर सरकारचे आदेश

Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड