नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही (Photo-X/@CMOMaharashtra)
महाराष्ट्र

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड–मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली.

Swapnil S

नांदेड : नांदेड–मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली. या निर्णयामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या उद्योग, व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आमदार हेमंत पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव बोढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नांदेड-मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड विमानतळ सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असून, मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

मुंबईतील नव्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्लॉट उपलब्ध होतील आणि नांदेड-मुंबई विमानसेवा नियमित सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिष्टमंडळाने दररोज सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. या सेवेचा लाभ नांदेडसह लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील नागरिकांनाही होईल, असे त्यांनी नमूद केले. याचवेळी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाअंतर्गत नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या मागणीकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. २०२५ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले

Mumbai : मूकबधिर महिलेला हायकोर्टाचा दिलासा; दोन वर्षांनंतर जामिनावर सोडण्याचे आदेश

धरणातील पाणीसाठा वाढू लागला; मुंबईकरांना काहीसा दिलासा काहीसा दिलासा

महापौरांकडून दुजाभाव; किशोरी पेडणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गेमिंग झोनच्या सुरक्षा निकषांचा आढावा घेणार; विधान परिषदेत मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन