नाशिकमध्ये अत्याधुनिक 'अन्नपूर्ती धान्य एटीएम' सुरू; आता २४ तास मिळणार धान्य (Photo-X)
महाराष्ट्र

नाशिकमध्ये अत्याधुनिक 'अन्नपूर्ती धान्य एटीएम' सुरू; आता २४ तास मिळणार धान्य

रास्तभाव दुकानांच्या वेळेची मर्यादा ओलांडून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नाशिक येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक 'अन्नपूर्ती धान्य एटीएम' सुरू करण्यात आले आहे.

Swapnil S

लासलगाव : रास्तभाव दुकानांच्या वेळेची मर्यादा ओलांडून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नाशिक येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक 'अन्नपूर्ती धान्य एटीएम' सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लाभार्थीकेंद्रित होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील डिस्टिलरी क्वार्टर, गोरेवाडी रोड येथे भुजबळ यांच्या हस्ते या धान्य एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या सुविधेमुळे लाभार्थ्यांना अधिक सोयीच्या वेळी धान्य मिळविणे शक्य होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त प्रशांत काळे, जिल्हा धान्य वितरण अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

तंत्रज्ञानामुळे धान्य वितरण सुलभ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य सन्मानाने आणि वेळेत मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून धान्य वितरण अधिक सुलभ करणे आवश्यक असून, 'अन्नपूर्ती धान्य एटीएम' हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सुमारे ५४ हजार रास्तभाव दुकाने कार्यरत असून, त्यांच्यामार्फत सात ते साडेसात कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जातो. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या नागरिकांना रास्तभाव दुकानांच्या निर्धारित वेळेत धान्य घेणे अनेकदा अडचणीचे ठरते. या नव्या सुविधेमुळे लाभार्थ्यांना अधिक सोयीच्या वेळी धान्य मिळविणे शक्य होणार आहे.

नागपूर आणि ठाण्यातही सुविधा

उपायुक्त प्रशांत काळे यांनी सांगितले की, या सुविधेमुळे स्थलांतरित कामगारांसह सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार धान्य मिळविणे सुलभ होईल. राज्यात प्रस्तावित तीन धान्य एटीएमपैकी पहिले एटीएम नाशिक येथे सुरू झाले असून, पुढील एटीएम नागपूर आणि ठाणे येथे सुरू करण्याचे नियोजन आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धान्य एटीएमच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई