महाराष्ट्र

अशोक खरातप्रकरणी चौकशीसाठी SIT स्थापन; पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार नेतृत्व

नाशिकमधील भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरातच्या महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरातच्या महिला अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. ‘एसआयटी’ या गुन्ह्याचा सखोल तपास करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने ‘एसआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

तेजस्विनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेली अन्य काही कृष्णकृत्ये, काळे कारनामे, तसेच त्याचे असलेले लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

महिला अत्याचार प्रकरणानंतर आता बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. नाशिक पोलिसांनी यापूर्वीच खरातच्या घराची झडती घेतली होती. आता फार्म हाऊसवर मिळालेले पुरावे आणि एसआयटीचा तपास यातून खरातचे मोठे रॅकेट उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. विविध राजकीय पक्षांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video