Nashik : अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची माघार; महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा 
महाराष्ट्र

Nashik : अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची माघार; महायुतीच्या नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा

विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केलेले गोकुळ गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Swapnil S

नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केलेले गोकुळ गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपण निवडणूक प्रचार थांबवत असल्याची घोषणा केली.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांच्या माघारीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.

गोकुळ गीते यांच्या माघारीपूर्वी भाजप नेते तथा त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश गीते यांच्या निवासस्थानी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक तास चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून गीते यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले.

मी कोणत्याही चौकशीला घाबरलेलो नाही. मात्र सर्वांचा आदर राखण्यासाठी आणि व्यापक हित लक्षात घेऊन माघार घेत आहे. तसेच दराडे बंधूंच्या कुटुंबात दोन आमदार असल्याने त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
गोकुळ गीते, अपक्ष उमेदवार

बळीराजाला आधार, शेतीला नवी उभारी

आजचे राशिभविष्य, २८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण