नाशिक TCS प्रकरण : संशयित निदा खानच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी 
महाराष्ट्र

नाशिक TCS प्रकरण : संशयित निदा खानच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी

नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील एक संशयित असणाऱ्या निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २७ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील एक संशयित असणाऱ्या निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २७ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. निदा खानवर टीसीएसने अखेर निलंबनाची कठोर कारवाई केली असून ९ एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली. पण सोमवारी ही बाब समोर आली आहे.

निदा खान सध्या न्यायालयीन किंवा पोलिस कोठडीत आहेत. या परिस्थितीमुळे त्या आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास निलंबन आदेशात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, निदा खान या २७ डिसेंबर २०२१ पासून कंपनीशी संलग्न होत्या. त्या 'प्रोसेस असोसिएट' या पदावर कार्यरत होत्या. कंपनीने त्यांचा नेटवर्क ॲक्सेसही तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. याव्यतिरिक्त, सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या सर्व मालमत्ता परत करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहण्यास अथवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा