महाराष्ट्र

Raigad : अट्टल केमिकल तस्कर अश्रफ खान अटकेत; टँकरमधून केमिकल चोरून ड्रममध्ये भरणारे ताब्यात

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे डोलवी येथे उभ्या टँकरमधून मालकाच्या संमतीशिवाय फायड्राझूर केमिकल चोरून ते ड्रममध्ये भरत असताना दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

Swapnil S

पेण: मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे डोलवी येथे उभ्या टँकरमधून मालकाच्या संमतीशिवाय फायड्राझूर केमिकल चोरून ते ड्रममध्ये भरत असताना दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. रायगड जिल्ह्यात गेली अनेक वर्षे चोऱ्या करणाऱ्या अट्टल केमिकल तस्कर अश्रफ खान यालाही या कारवाईत अटक करण्यात आली आहे.

३० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता मौजे डोलवी येथील हार्डवेअर रोडच्या बाजूला असलेल्या भंगार दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभ्या टँकर (क्रमांक एमएच ४३ वाय ७१५२) मधून केमिकल चोरी करून ड्रममध्ये भरले जात होते. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद केले असूनही वडखळ पोलीस स्टेशन हद्दीत मात्र वाढ होताना दिसत आहे. अश्रफ खान हा केमिकल तस्करी गेली अनेक वर्षे करत असून पुणे, महाड मार्गे येणाऱ्या केमिकलच्या टँकरमधून ड्रायव्हरशी संगनमत करून शेकडो लिटर वेगवेगळ्या प्रकारचा घातक व महागडा केमिकल चोरीच्या उद्देशाने काढत होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत मुख्य केमिकल तस्कर अशरफ कमरुद्दीन खान आणि त्याचा सहकारी सैबान महंमद इलियास खान अशरफ कमरुद्दीन खान यांना ताब्यात घेत वडखळ पोलिसांच्या अटक केली आहे. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वडखळ पोलीस करीत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

नागपूरमध्ये साऊंड सिस्टिमवर बंदी; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune : आवाज मर्यादेतच ठेवा! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला