(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

NWMC Election : नांदेड-वाघाळावर भाजपचा झेंडा; एमआयएमलाही लक्षणीय यश

दोन आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला फक्त २ जागा मिळाल्या.

Swapnil S

भास्कर जामकर/ नांदेड

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत काँग्रेसचा बालेकिल्ला अखेर मोडला गेला. खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ८१ पैकी ४५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर एमआयएमने १३, तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने १७ जागा मिळवल्या, ज्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासाठी चुरस निर्माण झाली.

दोन आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला फक्त २ जागा मिळाल्या. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या २० प्रभागांमधील ८१ नगरसेवकांच्या निवडीसाठी गुरुवारी मतदान झाले. मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून नांदेड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू झाली.

पुर्वीच्या निवडणुकीत (२०१७) काँग्रेसला ८१ पैकी ७६ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा विजय विशेष महत्त्वाचा ठरतो.

पक्षीय निकाल:

  • भाजप – ४५

  • एमआयएम – १४

  • काँग्रेस – १०

  • अपक्ष – १

  • शिवसेना – ४

  • राष्ट्रवादी – २

  • वंचित – ५

  • एकूण – ८१

मी नांदेडकरांचा मनापासून आभारी आहे. हा विजय नांदेडकरांच्या विश्वासाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार यांच्या मेहनतीचं हे फळ आहे.भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा अर्थ आहे की नांदेडकरांचा कौल विकासाला आणि सकारात्मकतेला आहे. विरोधकांकडे मुद्दे नव्हते; मला फक्त शिव्याशाप, अपप्रचार आणि नकारात्मकतेचा परिणाम दिसला नाही. या निवडणुकीत विरोधक भुईसपाट झाले असून, माझ्यावर नांदेडकरांचा प्रेम व सहकार्य कायम ठेवण्याबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे.
खा. अशोक चव्हाण

हिटवेव्हनंतर हवामानात बदल! मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

FASTag Annual Pass : फास्टॅग वार्षिक पास महागला; १ एप्रिलपासून मोजावी लागणार 'इतकी' किंमत

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल सुद्धा घेणार गायनातून ब्रेक? म्हणाली, "कधी कधी मलाही असं वाटतं…"