महाराष्ट्र

"शिंदे मुख्यमंत्री राहिले तर राज्यात गुन्हेगारच पैदा होतील...शिंदेंचा राजीनामा घ्या", गोळीबारानंतर गायकवाडांचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि ते भाजपसोबतही गद्दारीच करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझाही विश्वासघात केला आहे. त्यांनी शपथ घेऊन सांगावं की...

Swapnil S

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही, असे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली, पण त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

माझ्यासमोर पर्याय नव्हता...

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांनी हिंमत करून मला अडवले. मात्र त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता. पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, माझ्या मुलासाठी मी हे सगळं केलंय, कोणी माझ्या मुलालाच मारत असेल तर मी हे सहन करू शकत नाही. एक बाप म्हणून मी हे केलं आहे, असे गणपत गायकवाड म्हणाले. तसेच, मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना आधीच कल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील

एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असे गायकवाड म्हणाले. मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले.

गुन्हेगारी संपवायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि ते भाजपसोबतही गद्दारीच करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझाही विश्वासघात केला आहे. लाखो रुपयांचा गंडा घातला आहे, असा आरोप देखील गायकवाड यांनी केला. एकनाथ शिंदेंकडे माझे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की, गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत. माझे एवढे पैसे खाऊनही ते माझ्याविरोधातच काम करत आहेत. याप्रकरणी आता कोर्ट जो निर्णय देईल ते मला मान्य असेल. पण, महाराष्ट्रात यापुढे गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती असेल की शिंदेंचा राजीनामा घ्या. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी पोसली असून ही गुन्हेगारी संपवायची असेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उल्हासनगरच्या हिल लाइन पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट