AI Generated Image
महाराष्ट्र

पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेज होणार; ५६८.८६ कोटींची निविदा मंजूर

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर हा मीटरगेज असलेला रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार आहे. केंद्र सरकारने या ब्रॉडगेजच्या कामाला गती दिली असून या कामासाठी ५६८ कोटी ८६ लाखांची अशोका बिल्डकॉन कंपनीची निविदा मंजूर केली आहे. यामुळे या कामाला गती येणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Swapnil S

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर हा मीटरगेज असलेला रेल्वे मार्ग ब्रॉडगेज होणार आहे. केंद्र सरकारने या ब्रॉडगेजच्या कामाला गती दिली असून या कामासाठी ५६८ कोटी ८६ लाखांची अशोका बिल्डकॉन कंपनीची निविदा मंजूर केली आहे. यामुळे या कामाला गती येणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पाचोरा-जामनेर या मीटरगेज रेल्वे मार्गावर धावणारी ब्रिटीशकालीन गाडी ही नागरिकांचे आकर्षण होते. ५३ किमी अंतर धावणारी ही पीजे रेल्वे म्हणून ही नागरिकांमध्ये लोकप्रिय होती. काळानुसार या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू झाल्यानंतर अखेर केंद्राने ही मागणी मान्य केली.

३० महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट

पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी ५६८ कोटी ८६ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून यामुळे सिव्हिल कामाला गती मिळणार आहे. यात लहान मोठे पूल, अंडर ब्रिज, ओव्हर ब्रीज, रस्ते, यार्ड व यार्डमधील रस्ते या कामांचा समावेश असून हे काम अशोका बिल्डकॉन लि. या कंपनीला देण्यात आले आहे. ३० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम तसेच विद्युतीकरण, सिग्नलचे काम सुरू केले जाईल. या ब्रॉडगेज लाइनमुळे शेतीमाल वाहतूक, पर्यटनास चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

IDBI Bank Privatisation: मोठी बातमी! IDBI बँकेतील हिस्सा फेअरफॅक्सला विकणार; तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांची डील

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

Mumbai : तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

Mumbai : स्क्रीन टाईम, जंक फूडमुळे बाल लठ्ठपणा वाढतोय; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० प्रकरणे नोंदवली