महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा होणार लिलाव

25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती आहे.

Rakesh Mali

भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्षा असलेल्या 'परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना' विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून या कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने लिलाव प्रक्रिया जाहीर केली असून २५ जानेवारी रोजी हा लिलाव पार पडणार आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जाच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाकडून ही लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वीही बजावली होती नोटीस-

जीएसटी विभागाने काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यास 19 कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसहभागातून 19 कोटी रुपये देण्याची तयारी केली होती. मात्र, पंकजा यांनी याला नकार दिला होता.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी हा साखर कारखाना उभा केला होता. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी हा कारखाना उभारला होता. मात्र, मागील काही वर्षात कारखान्यावर अनेक बँकांचे कर्ज झाले. त्यापैकी युनियन बँक ऑफ इंडियाचे देखील 203 कोटी 69 लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे या प्रकरणी बँकेने नोटीस काढत कारखान्याचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे.

मुंबईत उन्हाळ्याचा विक्रम, ऑरेंज अलर्ट जारी

ऐन उन्हाळ्यात राज्यात मलेरिया - डेंग्यूचा कहर! मुंबईत मलेरियाच्या ९१८ रुग्णांची नोंद; तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्या २,३९२

'एक फुल, दो माली'ची अनोखी प्रेमकथा; एका तरुणीवर दोन पतींचा दावा, प्रकरण गेले वेगवेगळ्या हायकोर्टात

समाज माध्यमांतील बदनामी रोखण्यासाठी समिती; पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली लवकरच स्थापना - मुख्यमंत्री

शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 'लवकर या, लवकर जा' सवलत; मुंबई महानगर क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घोषणा