महाराष्ट्र

पेणमधील स्ट्रॉग रूममध्ये उंदराने दरवाजा उघडल्याने गोंधळ; CCTV मुळे सत्य समोर

पेण येथील के. ई. एस. स्कूलमध्ये नगरपालिका निवडणुकीनंतर मतपेट्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रॉग रूममध्ये पोलीस बंदोबस्त असून निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी देखरेखीसाठी तैनात होते.

Swapnil S

पेण : पेण येथील के. ई. एस. स्कूलमध्ये नगरपालिका निवडणुकीनंतर मतपेट्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रॉग रूममध्ये पोलीस बंदोबस्त असून निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी देखरेखीसाठी तैनात होते.

शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉग रूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांच्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने अचानक गोंधळ उडाला. याची माहिती उमेदवारांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. उमेदवारांच्या मागणी नुसार सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. या फुटेजमध्ये उंदराने दरवाजा उघडल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

तहसीलदार तानाजी शेजाळ आणि इतर अधिकारी स्ट्रॉग रूमवर पोहोचून घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी सांगितले की, उंदरामुळेच लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला गेला, तसेच हेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही निदर्शनास आले.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'