संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पूजा खेडकरला मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

‘यूपीएससी’ची परीक्षा देताना फसवणूक करून आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला

Swapnil S

नवी दिल्ली : ‘यूपीएससी’ची परीक्षा देताना फसवणूक करून आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासात सहकार्य करण्याचे आदेशही पूजा खेडकरला देण्यात आले आहेत.

पूजा खेडकर हिच्यावर ‘यूपीएससी’ची परीक्षा देताना फसवणूक केल्याचा तसेच ओबीसी आरक्षण आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजा खेडकर हिला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी पूजा खेडकर हिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकर ही तपासामध्ये सहकार्य करत नाही. तसेच तिच्याविरोधातील आरोप हे गंभीर आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पूजा खेडकर हिच्यावर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ मध्ये ‘यूपीएससी’च्या परीक्षेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. मात्र, पूजा खेडकर हिने तिच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

तिचा गंभीर गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाचा सवाल

याप्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, पूजा खेडकर हिने कुठला गंभीर गुन्हा केला आहे? ती अमली पदार्थांचा व्यापार करणारी माफिया किंवा दहशतवादी नाही आहे, तिने कुणाची हत्या केलेली नाही, तिने ‘एनडीपीएस’चा गुन्हा केलेला नाही, तिने सारे काही गमावलेले आहे. तसेच तिला आता कुठेही नोकरी मिळणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील एकूण परिस्थिती पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्तीला जामीन दिला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान