पुण्यात भोंदू ‘महाराजा’कडून महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी फरार, प्रकरण मंजिरी पोलिसांकडे वर्ग  
महाराष्ट्र

पुण्यात भोंदू ‘महाराजा’कडून महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपी फरार, प्रकरण मंजिरी पोलिसांकडे वर्ग

नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, पुण्यातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Swapnil S

पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच, पुण्यातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई येथील ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूवर ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पुण्यातील रहिवासी असून तिची आणि आरोपी ऋषिकेश वैद्य यांची ओळख वसईतील एका फाऊंडेशनच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्यांच्यात संवाद वाढला.

आरोपीने स्वतःला आध्यात्मिक गुरू असल्याचे भासवून आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन केला.आरोपीने आपण ‘भगवान महादेवाचा अवतार’ असल्याचे सांगत पीडित महिला ही आपली ‘पार्वती’ असल्याचा दावा केला. या खोट्या दाव्याच्या आधारे त्याने २०२३ मध्ये पुण्यातील मंजिरी परिसरातील एका लॉजमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी आरोपीने पीडितेची काही छायाचित्रे काढून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, याच छायाचित्रांचा धाक दाखवत आरोपीने २०२५ मध्ये वसई येथील एका लॉजमध्ये पुन्हा महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी सुरुवातीला माणिकपूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, पहिली घटना पुण्यात घडल्याने तपास आता मंजिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

आरोपी हा स्वयंघोषित ‘महाराज’ असून त्याने आपल्या ओळखीचा गैरवापर करून हा गंभीर गुन्हा केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत शोधमोहीम सुरू आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेला पुढे येऊन तक्रार करण्याचे धैर्य मिळाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक किंवा छळ झाला असल्यास न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मांजरी पोलीस करत आहेत.
निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा

Mumbai : गोरेगाव-ओशिवरा प्रवास होणार जलद; बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सावधान! वर्तमानपत्रात पॅक केलेले समोसे-भजी खाताय? FSSAI कडून आरोग्याबाबत धोक्याचा इशारा

Mumbai : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जंगल सफरीची संधी; कधी आणि कसं जायचं? वाचा सविस्तर

Mumbai : ७ जूनपासून पाणीटंचाईची शक्यता; वॉटर टँकर असोसिएशनकडून बेमुदत संपाचा इशारा

एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO