संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करा! गिरीश महाजन यांचे आवाहन

पुण्याच्या गणेशोत्सवाचे नाते संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेशी जोडलेले असून संपूर्ण देशाचे लक्ष या उत्सवाकडे लागून असते.

Swapnil S

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे नाते संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेशी जोडलेले असून संपूर्ण देशाचे लक्ष या उत्सवाकडे लागून असते. अशा या ऐतिहासिक उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण उत्सवातील लाऊडस्पीकरची बंधने पोलीस ठरवत नसून ती सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिली आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच उत्सव साजरा व्हायला हवा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या (पुणे शहर महापालिका क्षेत्र विभाग) पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आदी उपस्थित होते.

मंडळांना पुरस्कार

या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये भोसले मार्ग, भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत हडपसरमधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले, तर अरण्येश्वर येथील तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळ ट्रस्टने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला पाचव्या क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव

Mumbai : गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप; तीन हजार लिटर कलरचे वितरण