महाराष्ट्र

पुण्यातील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; गर्भपातासाठी नेरूळला आल्यावर घटना उघडकीस

पुण्यातील बाणेर भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणी गरोदर राहिल्याने तिच्या आईने तिला गर्भपातासाठी नेरूळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Swapnil S

नवी मुंबई : पुण्यातील बाणेर भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणी गरोदर राहिल्याने तिच्या आईने तिला गर्भपातासाठी नेरूळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश चव्हाण (२२) याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील म्हाळुंगे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

या घटनेतील पीडित तरुणी ही पुण्यात आईवडिलांसह राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी आकाश चव्हाण देखील त्याच भागात राहण्यास आहे. आरोपी आकाश चव्हाणने पीडित तरुणीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत मैत्री केली. पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर याबाबत आपली मुलगी गरोदर राहिल्याची बाब इतरांना समजल्यास बदनामी होईल, या भीतीने पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी गत रविवारी पुणे येथून नेरूळ गाठले. त्यानंतर आईने पीडित मुलीला नेरूळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पीडित तरुणी चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती नेरूळ पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

चव्हाण याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी म्हाळुंगे पोलिसांकडे वर्ग केला आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती