X
महाराष्ट्र

Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक

Pune Accident: आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रिअल इस्टेट डेव्हलपर वडिलांना पोलिसांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली.

Tejashree Gaikwad

Maharashtra Pune Accident: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलानं दारू पिऊन बेदरकारपणे आलीशान पोर्श गाडी चालवत समोरील दुचकीवरील दोघांना उडवले होते. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. आरोपी असलेल्या या अल्पवयीन मुलाच्या रिअल इस्टेट डेव्हलपर वडिलांना पोलिसांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली. पोलिसांच्या अहवालानुसार, १७ वर्षांच्या तरुणाने चालवलेल्या एका लक्झरी पोर्शने एका मोटारसायकलला धडक दिली आणि त्यात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला होता.

ही घटना १९ मे रोजी पहाटे घडली. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका रिअल इस्टेट डेव्हलपरच्या १७ वर्षीय मुलाने दुचाकीवरून जात असलेल्या एका मुलाला आणि मुलीला त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. घटनेच्या १४ तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला. हा भीषण अपघात बघता सोमवारी, पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे आरोपींवर प्रौढ आरोपी म्हणून खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांचे अपील फेटाळले होते.

याप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "आरोपींवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवण्यात यावा यासाठी आम्ही उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे." सीपी अमितेश कुमार यांनी सांगितले की, "आरोपींवर आयपीसी कलम ३०४ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला प्रौढ मानले जावे यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली."

'या' अटींवर झाली अल्पवयीन आरोपींची सुटका

हा गुन्हा जामीन नाकारण्याइतका गंभीर नसल्याचे सांगत बाल न्याय मंडळाच्या कनिष्ठ न्यायालयाने १४ तासांच्या आत अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर केला. त्याच्या सुटकेसाठी न्यायालयाने काही अटी देखील ठेवल्या. या अटीनुसार त्याने १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करणे, रस्ते अपघातांचे परिणाम आणि त्यांचे निराकरण यावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे अशा गोष्टी आहेत.

राज्यातील डॉक्टर आज संपावर; होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा सराव करण्याच्या परवानगीला विरोध

प्रतीक्षा संपणार! नवी मुंबई विमानतळावरून ३० सप्टेंबरला पहिले उड्डाण ? PM मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

Mumbai : कुलाबा ते आरे थेट प्रवास; मेट्रो-३ ची संपूर्ण मार्गिका ३० सप्टेंबरपासून सेवेत; PM मोदी करणार उद्घाटन

आपत्कालीन वैद्यकीय सेवा विस्तारात अपयश; मध्य रेल्वेच्या चार स्थानकातच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध

Nashik : कालिका माता मंदिर २४ तास खुले राहणार; भाविकांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध