पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंट या दोन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील खवय्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
१३ नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांनी हॉटेल वैशालीची तपासणी केली. अन्नसुरक्षेच्या ९८ निकषांपैकी हॉटेलला केवळ ५८ गुण मिळाले. स्वच्छतागृहासमोरील टेबलावर भांडी वाळत घालण्यात आली होती. अन्नपदार्थांच्या साठवणुकीत पाण्याचा आणि पिण्याच्या अद्ययावत तपासणी अहवाल नसणे अशा त्रुटीही निदर्शनास आल्या.
स्वयंपाकघर दरम्यान, रूपाली रेस्टॉरंटमध्येही तपासणीदरम्यान असुरक्षित अवस्थेत असल्याचे आढळले. परिसरात आणि उघड्या साचलेले पाणी, अस्वच्छता, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन तसेच कच्चे, अर्धप्रक्रिया केलेले आणि शिजवलेले पदार्थ योग्य प्रकारे झाकून न ठेवणे, लेबलिंग व वापरण्याच्या अंतिम तारखांचा अभाव अशा त्रुटी आढळल्या. तापमान नियंत्रण आणि आवश्यक अन्नसुरक्षा नोंदींचाही अभाव होता. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी या रेस्टॉरंटचाही परवाना निलंबित करण्यात आला.
जून महिन्यातही झाली होती कारवाई
जून २०२६ मध्येही वैशालीला त्रुटी सुधारण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक सुधारणा न झाल्याने सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशाने परवाना निलंबित करण्यात आला.