प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

Pune : पुरंदर विमानतळाचा मार्ग झाला मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

पुण्यातील नियोजित पुरंदर ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला विरोध करणारी आणि जमीन अधिग्रहण रोखण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

Swapnil S

मुंबई : पुण्यातील नियोजित पुरंदर ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला विरोध करणारी आणि जमीन अधिग्रहण रोखण्याची मागणी करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. विमानतळासारख्या मोठ्या सार्वजनिक पायाभूत प्रकल्पांची जागा निश्चित करणे हा सर्वस्वी शासनाचा धोरणात्मक निर्णय आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या अखत्यारीतील विषय आहे. यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

याचिकेवर न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पुरंदर तालुक्यातील उडाचीवाडी, पारगाव आणि इतर गावांमधील पंडित शिवाजी कुंभारकर, विकास कालूरकर कुंभारकर आणि चंद्रशेखर दिनकर मेमाणे या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शासनाने विमानतळासाठी आधी ठरवलेल्या ‘साईट १ए’ ऐवजी ‘साईट ५ए’चा पर्याय निवडावा. ‘साईट १ए’ ची जमीन सुपीक आणि बहुपीक देणारी शेती आहे, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी याचिकेतून मांडला होता.

जागा निवडण्याचा अधिकार सरकारचा

जागा निवडण्याचा अधिकार शासनाचा आहे. विमानतळ कुठे उभारावे, त्याची रचना कशी असावी आणि सार्वजनिक सुरक्षेचे निकष काय असावेत, हे ठरवण्याचे तांत्रिक ज्ञान केवळ सरकार आणि संबंधित तज्ज्ञ संस्थांकडेच असते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शेतकऱ्यांची मागणी धुडकावली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी