महाराष्ट्र

राहुल यांच्याकडून जातीय रंग; दरेकरांची परभणीबाबत टीका

परभणी घटनेला काँग्रेस नेते राहुल गांधींकडून जातीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : परभणी घटनेला काँग्रेस नेते राहुल गांधींकडून जातीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी काही आरोप केले. त्यांच्या या आरोपांना भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरेकर म्हणाले की, राहुल गांधी यांची वेगळी कार्यपद्धती आहे. जेव्हा राज्यात असे वातावरण असते तेव्हा जातीय रंग देऊन सामाजिक तेढ निर्माण करून आपल्याला राजकीय लाभ कसा घेता येईल याच्या प्रयत्नात ते असतात. देशभरात अशा घटना घडतात त्याला ते राजकारणाशी जोडतात. हा विषय संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान या मुद्द्यावर ते घेऊन जात आहेत. राहुल गांधी यांना संविधानावर बोलण्याचा अधिकारच नाही. संविधानात छेडछाड करण्याचे काम याच काँग्रेसने केलेय. आणीबाणीवेळी काय केले हे देशाने पाहिले.

दरेकर यांनी सांगितले की, संविधानप्रती आमची श्रद्धा आहे. आम्ही संविधानाचा सन्मान करण्याचे काम केलेय. उलट बाबासाहेबांचा अपमान करण्याचे काम वर्षानुवर्षे काँग्रेसने केलेय. तसेच देशभर काँग्रेसला अपयश आले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री