Pune : ‘गुन्हेगार ठरवल्यास पोलीस उपायुक्तांच्या घराबाहेर आत्महत्या करेन’; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Pune : ‘गुन्हेगार ठरवल्यास पोलीस उपायुक्तांच्या घराबाहेर आत्महत्या करेन’; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी आमदार व शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला.

Swapnil S

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी आमदार व शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत गंभीर इशारा दिला. या प्रकरणात आपल्याला गुन्हेगार ठरवण्यात आले, तर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या घराबाहेर आत्महत्या करेन, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणाशी आपला किंवा पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला.

गुलटेकडी येथील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडिओ तयार करून आर्थिक अडचणींसह काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. शेख यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने धंगेकर दाम्पत्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जामीन मिळाल्यानंतर धंगेकर यांनी वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. संबंधित जागेवर पुनर्विकासासाठी ‘उत्कर्ष असोसिएट्स’ची स्थापना करण्यात आली होती. प्रकल्पाला रेरा मान्यता आणि बँकेचे कर्ज मिळाले होते. मात्र, जागा वक्फ बोर्डाशी संबंधित असल्याची नोटीस मिळाल्यानंतर काम थांबले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे; नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना

­सत्तेत एकत्र, पण कारभारावरून संघर्ष! पाणीपुरवठा प्रकरणावरून सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप-शिंदे सेना आमनेसामने