महाराष्ट्र

राज्यातील दिव्यांगांना दिलासा; तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार, आरोग्य विभागाचा निर्णय

राज्यातील दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी आता तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणात मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी आता तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणात मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विशेषज्ञाची समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. 

दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुकास्तरावर उपलब्ध होणार आहे. तालुकास्तरावर १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील विशेषज्ञांची समिती स्थापन करावी. या समितीद्वारे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरे आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा, असे असे निर्देश सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयांना आरोग्य विभागाने दिले आहेत. 

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य