कांद्याला तीन हजार हमीभाव द्या! आमदार रोहित पवार यांची मागणी (Photo-X/@RRPSpeaks)
महाराष्ट्र

कांद्याला तीन हजार हमीभाव द्या! आमदार रोहित पवार यांची मागणी

येत्या आठवडाभरात केंद्र व राज्य सरकारने कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा आणि बाजार समित्यामध्ये विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी येथे दिला.

Swapnil S

लासलगाव : येत्या आठवडाभरात केंद्र व राज्य सरकारने कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. आणि बाजार समित्यामध्ये विक्री झालेल्या कांद्याला १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी येथे दिला.

कांद्याला मातीमोल भाव देऊन बळीराजाला उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी आणि शेतमालाला हमीभाव व विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी मविआतर्फे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा अशा जोरदार घोषणा देत बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून शेतकऱ्यांनी कांद्याची माळ गळ्यात घालून ट्रॅक्टरवर आमदार रोहित पवार, खासदार भगरे, खासदार लंके, माजी आमदार सुनील भुसारा यांना बसून बाजार समिती आवारात कांदा लिलाव स्थळी आणले. त्यांनी बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारच्या निर्यात धोरण व शेतकरी विरोधी निर्णयाबद्दल टीका केली. लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलनाचे रणशिंग फुकताना लढा केवळ कांद्याच्या भावाचा नाही, तर शेतकऱ्याच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा असल्याने रोहित पवार यांनी शेतकऱ्यांनाच थेट सवाल विचारले की, सध्या बाजार समितीत कांद्याला मिळणारे भाव परवडणारे आहेत का त्यामध्ये उत्पादन खर्च निघतो का? मजुरी, खते, बियाणे खर्चात वाढ झालेली आहे. कांदा उत्पादनासाठी एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो का? विधान सभेच्या निवडणूक आधी २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री असताना कांद्याला एक भाव २४०० रुपये देण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते आणि आज मुख्यमंत्री असताना चक्क १२३५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला तो सर्वांना मान्य आहे का? असे विचारले असता शेतकऱ्यांनी अमान्य असल्याचे जोरदार घोषणा देत स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार म्हणाले की, कांदा दर प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने पाशा पटेल या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने अद्याप अहवाल सादर केला नाही. आता या प्रश्नावर सचिवांची समिती नेमून केवळ वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप केला. निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस उप अधीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल