RTE प्रवेशाची निवड यादी जाहीर; राज्यात १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेश 
महाराष्ट्र

RTE प्रवेशाची निवड यादी जाहीर; राज्यात १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेश

आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रकिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. आरटीई प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. या यादीत राज्यभरातून आलेल्या २ लाख ८९ हजार २८६ अर्जामधून १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली तर ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.

Swapnil S

मुंबई :आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रकिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. आरटीई प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. या यादीत राज्यभरातून आलेल्या २ लाख ८९ हजार २८६ अर्जामधून १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली तर ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठवण्यात आले आहेत.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १७ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली. राज्यभरातील ८ हजार ७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज आले होते.

मुंबईतून ४ हजार ९४१ विद्यार्थ्यांची निवड

मुंबईतून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४५५८ जागा आहेत आणि इतर मंडळासाठी ७३ शाळांमध्ये १४६५ जागा आहेत. अशा एकूण ३२५ शाळांमधील ६०२३ राखीव जागांसाठी एकूण १०३८३ ऑनलाइन पात्र अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ९४१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत