महाराष्ट्र

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

९ ते १३ जानेवारी या कालावधीत १० टप्प्यात काम करण्यात येणार आहे. पुढील पाच दिवस ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेत वाहतूक रोखण्यात येणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्वी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. ९ ते १३ जानेवारी या कालावधीत १० टप्प्यात हे काम करण्यात येणार आहे. पुढील पाच दिवस ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेत वाहतूक रोखण्यात येणार आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरीता थांबवली जाणार आहे.

समृद्वी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील तालुका धामणगाव रे.,तालुका चांदूर रे. व तालुका नांदगांव खंडेश्वर दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. या दरम्यान कामाच्या टप्यानजीक संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. प्रत्येक टप्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या काळात प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वेळेचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाहतूक बंद राहण्याचे वेळापत्रक

९ जानेवारी

  • मांजरखेड आणि धोत्रा (मुंबई दिशेने) – दुपारी ३ ते ४

  • मांजरखेड (नागपूर दिशेने) – दुपारी १२ ते १

१० जानेवारी

  • खंबाळा (मुंबई दिशेने) – दुपारी १२ ते १

  • वाढोना (नागपूर दिशेने) – दुपारी ३ ते ४

१२ जानेवारी

  • पाचोड (मुंबई दिशेने) – दुपारी १२ ते १

  • शहापूर खेकडी (नागपूर दिशेने) – दुपारी ३ ते ४

१३ जानेवारी

  • देऊळगाव, शहापूर खेकडी (मुंबई दिशेने) – दुपारी १२ ते १

  • देऊळगाव (नागपूर दिशेने) – दुपारी ३ ते ४

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल