वाल्मिक कराड (संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मीक कराड गँगची तुरुंगातही दहशत

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्याचा सहकारी प्रतीक घुले या दोघांनी बीड जिल्हा कारागृहात एका कैद्याला जबर मारहाण केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या घटनेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Swapnil S

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्याचा सहकारी प्रतीक घुले या दोघांनी बीड जिल्हा कारागृहात एका कैद्याला जबर मारहाण केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या घटनेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पीडित व्यक्ती या दोघांच्या मारहाणीमुळे आपले वरचे हाड बाहेर आल्याचा दावा करताना ऐकू येत आहे. या घटनेमुळे वाल्मीक कराड गँगची तुरुंगातही मोठी दहशत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजहर अब्दुल रहमान पठाण असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप नामक अन्य एका कैद्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, या कैद्यांमध्ये जेलमधील बराकीत बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातून सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप या तिघांनी अजहर पठाण याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कैद्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती आहे. स्वतः पीडित कैद्याने आपल्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी