सर्वपक्षीय बैठकीची शरद पवारांची मागणी 
महाराष्ट्र

सर्वपक्षीय बैठकीची शरद पवारांची मागणी

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रदेश कँग्रेसचे अध्यक्ष    हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांनी जनतेला काटकसर सांगण्यापूर्वी स्वतःच्या आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील खर्च कमी करावा, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.

या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

विविध तज्ज्ञांचीही बैठक घेण्याची मागणी

शरद पवार यांनी पुढे अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध तज्ज्ञांची तातडीने बैठक घेण्याचीही मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सखोल आढावा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

देशहितासाठी सामूहिक निर्णय प्रक्रिया प्रभावी...

राष्ट्रीय हिताशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीत एकत्रित चर्चा आणि व्यापक सल्लामसलत गरजेची असल्याचे सांगत पवार यांनी केंद्र सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. देशहिताच्या मुद्द्यांवर सामूहिक निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'