संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

तपासात सहकार्य करत नसल्याने शीतल तेजवानीला अटक; राज्य सरकारचा दावा; मुंढवाप्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या पुण्यातील मुंढवा येथील कोरेगाव पार्क जमीन खरेदी गैरप्रकारात शीतल तेजवानी प्रमुख आरोपी असून तिच्याविरोधात अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रितसर नोटीस बजावल्यानंतरही ती तपासात सहकार्य करत नसल्याने तिला अटक करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने हायकोर्टात केला.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या पुण्यातील मुंढवा येथील कोरेगाव पार्क जमीन खरेदी गैरप्रकारात शीतल तेजवानी प्रमुख आरोपी असून तिच्याविरोधात अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रितसर नोटीस बजावल्यानंतरही ती तपासात सहकार्य करत नसल्याने तिला अटक करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने हायकोर्टात केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने निर्णय राखून ठेवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल १८०० कोटींच्या मालमत्तेचा केवळ ३०० कोटी रुपयांत व्यवहार केल्याचा गंभीर आरोप झाला. या खरेदी-विक्रीदरम्यान नियमांनुसार २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले नाही, असे उघड झाले. या पार्श्वभूमीवर या व्यवहारात ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’धारक शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका शीतल तेजवानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सोमवारी सुनावणीवेळी शीतल तेजवानी यांच्या वतीने युक्तिवाद करताना आपल्याला मीडिया रिपोर्ट्समूळे लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला. एफआयआर प्रसारमाध्यमांतील बातम्यांच्या आधारावर दाखल केला आहे, याकडे न्यायालायचे लक्ष वेधले. तसेच पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली असून अटक करताना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याने गुन्हा रद्द करावा, अशी विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने याचिकेलाच जोरदार आक्षेप घेण्यात आला. तेजवानी हिला नोटीस बजाबण्यात आली होती. तपासात सहकार्य केले नाही म्हणून तिला अटक करण्यात आली. तसेच अन्य प्रकरणातही तिने फसवणूक केली असल्याने याचिका फेटाळावी, अशी मागणी केली.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...